Prohibition: नराधम ‘महाराजा’च्या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ गाव कडकडीत बंद 

0


Prohibition: पारनेर: तालुक्यातील ढवळपुरी गाव आज (ता.१७) एका संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पूर्णपणे बंद(Prohibition) राहिले. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून अमानुष अत्याचार केल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या नराधम ‘महाराजा’ने पीडितेचे केवळ लैंगिक शोषणच केले नाही, तर तिला गरम लोखंडी पकडीने चटके देऊन तिचा शारीरिक छळही (Physical harassment) केला. या क्रूर कृत्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.१७) सकाळी ग्रामपंचायतसमोर एकत्र येत आरोपीच्या प्रतितात्मक पुतळ्याचे दहन केले आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

अवश्य वाचा-  ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

महिलांनीही व्यक्त केला तीव्र संताप (Prohibition)

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच नंदाताई गावडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्या हातांनी मुलांना संस्कार द्यायचे, त्याच हातांनी एका निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हे अत्यंत नीच कृत्य आहे. अशा भोंदू महाराजांना समाजात कोणतेही स्थान नसावे आणि कायद्याने त्याला कठोर शासन करावे, तरच अशा प्रवृत्तींना आळा बसेल. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनीही तीव्र संताप व्यक्त केला. पीडितेला दिलेले चटके हे माणुसकीवर ओढलेले ओरखडे आहेत, अशा नराधमाला भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी एका संतप्त महिला ग्रामस्थाने केली. गावातील तरुणांनीही या घटनेमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत, आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घालू नये, असा पवित्रा घेतला.

नक्की वाचा- पारनेर महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ रथाचे स्वागत उत्साहात

खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी (Prohibition)


या घटनेने पारनेर तालुक्यात सामाजिक अस्वस्थता पसरली असून, दुकाने आणि सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून ग्रामस्थांनी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटेच आरोपीला अटक केली असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधम थोरातला लवकरात लवकर सजा देण्याची मागणी केली आहे. ढवळपुरीकरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनावरही दबाव निर्माण झाला असून, अशा भोंदू व्यक्तींविरुद्ध समाजात मोठी लाट उसळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here