कोड रेड
Prohibitory Order : नगर : महाराष्ट्र (Maharashtra) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षाचे आयोजन १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील २८ उपकेंद्रांवर करण्यात आले आहे. परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अबाधित रहावी यासाठी केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory Order) जारी केले आहेत.
नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
परीक्षक व अधिकाऱ्यांची नियुक्ती
परीक्षेसाठी १० हजार ९४ उमेदवार बसलेले असून ७ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, २ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथकातील अधिकारी, २८ उपकेद्रप्रमुख म्हणून वर्ग १ चे अधिकारी, ५६ सहायक, १०५ पर्यवेक्षक, ४६३ समवेक्षक, ९ लिपीक, २८ केअर टेकर, २८ बेलमन, ५३ शिपाई, १०४ पाणी वाटप कर्मचारी आणि ३९ वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
उमेदवारांना स. ८.३० वाजता देण्यात येणार प्रवेश (Prohibitory Order)
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी ८.३० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी साधने आणण्यास आणि परिक्षा केंद्र परिसरात बाळगण्यास मनाई करण्यात आले आहेत. परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.