Prohibitory Order Issued : नगर : आगामी निवडणुकीच्या (Elections) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी ३ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक (मनाई) आदेश जारी (Prohibitory Order Issued) केले आहेत.
अवश्य वाचा: श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला
मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू
जिल्ह्यातील जामखेड, कोपरगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा व श्रीरामपूर या नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी असून, त्या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
नक्की वाचा : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस
कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे निर्देश (Prohibitory Order Issued)
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मिरवणुका, रॅली, सभा किंवा जमाव यासंबंधी ठरविलेले मार्ग, वेळा व पद्धती काटेकोर पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठरविलेल्या मार्गाव्यतिरिक्त मिरवणुका नेणे, वेळांचे उल्लंघन करणे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अनावश्यक गर्दी करणे यास मनाई करण्यात आली आहे.
प्रार्थना स्थळांच्या आसपास प्रार्थनेच्या वेळेत कोणताही गोंधळ, बेशिस्त वर्तन अथवा अडथळा निर्माण करण्यास मनाई आहे. तसेच रस्ते, घाट, धक्के, जत्रा, देवालये, मशिदी, दर्गे व सार्वजनिक मार्गांवर गैरशिस्तीचे प्रकार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक उपहारगृहांच्या परिसरात विनापरवाना वाद्य वाजविणे, कर्कश ध्वनीक्षेपकांचा वापर करणे, गाणी म्हणणे किंवा ढोल-ताशे वाजविणे यावर बंदी आहे. या संदर्भात आवश्यक सवलत किंवा परवानगी हवी असल्यास संबंधित नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिस्थितीनुसार आदेश देऊ शकतात, असेही या मनाई आदेशात नमूद करण्यात आले आहे.



