Beed Morcha:संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन  

0
Beed Morcha:संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन  
Beed Morcha:संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन  

Beed Morcha : बीडमधील (Beed Crime) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा राज्यातील सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात उद्या (ता.२८) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चा (Silent Front) आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत.‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर (Banners) करण्यात आला. उद्या सकाळी १० वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे.

नक्की वाचा : आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मनमोहनसिंग यांनी देशाला वाचवलं;शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली   

रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन (Beed Morcha)

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील दोषी लोकांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा, इत्यादी मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रैनापुर तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या परिवारातील अनेक सदस्यया मोर्चात सहभागी होणार आहेत. रैनापुर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय अशा या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे.

अवश्य वाचा : शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये पुन्हा बनावट पास विक्री,गुन्हा दाखल

‘बीड जिल्ह्यातील सर्व बंदुकीचे लायसन्स तातडीने रद्द करा’ (Beed Morcha)

बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा विचित्रपणे बेदम मारहाण करून खून करण्यात आला, त्यामुळे सध्या बीड जिल्हा चर्चेत आहे. परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये १२२२ जण हे बंदुकीचे परवानाधारक आहेत. जर इतर जिल्हे पाहिले तर बीड जिल्ह्यात पाच ते सहा पट बंदुकीचे परवानाधारक आहेत, त्यामुळे तत्काळ परवानाधारकांची पूर्ण तपासणी करण्यात यावी आणि सध्या तातडीने सर्व बंदुकीचे लायसन रद्द करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here