Protest movement : श्रीरामपूर : श्रीगोंदा तालुक्यात वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या गौण खनिज पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या (Attack) निषेधार्थ आणि गुन्हेगारांना तत्काळ अटक करुन कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात यावी, या मागणीसाठी आज श्रीरामपूर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन (Protest movement) पुकारले आहे. जोपर्यंत अटक व कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालु राहणार ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
अवश्य वाचा : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर
कर्मचाऱ्यांना जीवघेणा हल्ला करीत जबर मारहाण
श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी येथे अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील तीन मंडलाधिकारी, सहा तलाठी या कर्मचाऱ्यांना लाकडी दांडके व लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करीत जबर मारहाण केली. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चार दिवस उलटले तरी अद्यापही त्यातील आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्याच्या निषेधार्थ व आरोपींना कोणीही पाठीशी न घालता तत्काळ अटक करुन कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कालपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
नक्की वाचा : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन
आंदोलनात कर्मचाऱ्यांचा सहभाग (Protest movement)
या आंदोलनात श्रीरामपूर तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकुन, शिपाई व कोतवाल सहभागी झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावर जिल्हा तलाठी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, तालुकाध्यक्ष राजेश घोरपडे, कार्याध्यक्ष अशोक थोरात,उपाध्यक्ष हेमंत डहाळे, सरचिटणीस अशोक चितळकर यांच्यासह प्रविण सूर्यवंशी, निर्मला नाईक, तेजल सोनवणे, प्रज्ञा माटे, विकास शिंदे, अविनाश तेलतुंबडे, कचेश्वर भडकवाल, अशोक थोरात, शिवाजी दरेकर, इम्रान इनामदार, संदीप पवार, संतोष पवार,कुणाल काळे, संतोष लचोरे,व्ही.के.मंडलिक, पी.एस.ओहोळ, महेश खरपुडे, अशोक धनवटे आदी आंदोलनात सामील कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. श्रीरामपूर येथे जिल्हा तलाठी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुकाध्यक्ष राजेश घोरपडे, कार्याध्यक्ष अशोक थोरात, उपाध्यक्ष हेमंत डहाळे, सरचिटणीस अशोक चितळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.