PUC : ‘पीयूसी’ काढा नाहीतर जबर दंड माेजा

0
PUC : 'पीयूसी' काढा नाहीतर जबर दंड माेजा
PUC : 'पीयूसी' काढा नाहीतर जबर दंड माेजा

PUC : नगर : मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी (PUC) (प्रदूषण नियंत्रण) प्रमाणपत्र अनिवार्य आहे. पीयूसी केंद्रावर केवळ ५० ते १०० रुपयांत हे प्रमाणपत्र काढण्यात येते. तरीही अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा वाहनांना पोलिस अथवा आरटीओ (RTO) कार्यालयाच्या तपासणीत जबर दंड भरण्याची वेळ येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम (Traffic rules) पाळीत आवश्यक ती कागदपत्रे वाहन चालवताना जवळ बाळगावीत, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

हे देखील वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे


नगर शहरासह जिल्ह्यात वाहनांची संख्या माेठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणही वाढले आहे. वाहनांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पंधरा वर्षांवरील वाहन रद्द करण्यावर भर दिला जात आहे. पीयूसी नसेल तर दुचाकीसाठी दोन, चारचाकीसाठी चार हजार, तर वाहनाचा चालक मालक एकच असेल, तर एक हजार रुपये दंड आहे. याशिवाय पीयूसी नसल्यास विमा मिळण्यासाठीही अडचणी येतात. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

नक्की वाचा : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here