Pune Crime: पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

0
Pune Crime:पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक
Pune Crime:पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

नगर : पुण्यात (Pune Crime) पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने (Police Constable) सहा वाहनांना जबरदस्त धडक देत अनेकांना गंभीर जखमी (Police officer crashes into six cars) केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नक्की वाचा: “आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये प्रवेश करतील” -रोहित पवार  

सहा वाहनांना जोरदार धडक (Pune Crime)

समोर आलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी (ता. २) रात्री एका पार्टीला गेला होता. त्याने पार्टीदरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दारूच्या नशेत असतानाच त्याने कार चालवली आणि पुणे–नगर महामार्गावर सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून, काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवश्य वाचा: मराठमोळ्या छाया कदम यांनी फिल्मफेअरवर उमटवली मोहोर  

पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न (Pune Crime)

अपघातानंतर रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये हेमंत इनामेला अजूनही अटक करण्यात आली नसून त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.