Pune Crime : विद्येचं माहेरघर असलेले पुणे शहर पुन्हा एकदा बलात्काराच्या (Pune Rape Case) घटनेने हादरले आहे. पुण्यातील कोंढव्यात (Kondhwa) उच्चभ्रू सोसायटीमध्ये २५ वर्षीय महिलेवर घरातून घुसून बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. डिलिव्हरी बॉय (Delivery Boy)असल्याचे सांगत एक व्यक्ती घरात घुसला आणि तोंडावर स्प्रे मारून त्याने तरुणीवर बलात्कार केला. या कृत्यानंतर नराधमाने तरुणीच्याच मोबाईलमध्ये सेल्फी घेत परत येईल असा मेसेज लिहिला. या घटनेनंतर कोंढव्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.
नक्की वाचा : शुभमन गिलने रचला इतिहास;सचिन तेंडुलकर व विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड
कोंढव्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Pune Crime)
कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी(ता. २) रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. विशेष म्हणजे,आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून “मी पुन्हा येईन” असा संदेश देऊन तीव्र मानसिक धक्का दिला आहे. या घटनेत आरोपीने स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला “कुरिअर आहे” असे सांगितले. महिलेने “हे कुरिअर माझे नाही” असे स्पष्ट सांगून नकार दिला. मात्र आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला.
त्यामुळे महिलेला सेफ्टी डोअर उघडावा लागला. त्याच क्षणी या आरोपीने तिच्या तोंडावर एखादा केमिकल स्प्रे फवारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला. तसेच ‘मी पुन्हा येईन’ असा मजकूर टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवश्य वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत
कोंढवा पोलिसांकडून चौकशी सुरु (Pune Crime)
ही घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीने अतिशय हुशारीने डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत आत प्रवेश केला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी कसून चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.