Pune Crime News: मैत्रिणीलाच मागितली २० लाखाची खंडणी, श्रीगोंद्याच्या तरुणाला अटक

0
Pune News: मैत्रिणीलाच मागितली २० लाखाची खंडणी, श्रीगोंद्याच्या तरुणाला अटक
Pune News: मैत्रिणीलाच मागितली २० लाखाची खंडणी, श्रीगोंद्याच्या तरुणाला अटक

नगर: ज्या हाताने मैत्री जपली, त्याच हातांनी २० लाखांची मागणी केली! मैत्रीला काळिमा फासणारी एक घटना (An incident that tarnishes the bond of friendship) पुण्यात घडली आहे. जी ऐकून सगळेच हैराण होतील. आपल्याच मैत्रिणीला २० लाखांसाठी धमकावणारा तो तरुण अखेर पोलिसांच्या जाळ्यात (Arrested) अडकला आहे.

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेचा हप्ता झाला मंजूर, फेब्रुवारीचा हफ्ता ‘या’ दिवशी मिळणार

नेमकं प्रकरण काय ? (Pune Crime News)

एका २४ वर्षीय तरुणीला तिच्याच मित्राने २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी तातडीने  कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. हा तरुण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहे. पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यामध्ये मैत्री होती. मात्र, काही काळापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले होते. या वादाचा सूड उगवण्यासाठी आरोपीने तरुणीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, त्यानंतर तिच्याकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपीने पीडितेवर दबाव टाकण्यासाठी अत्यंत खालची पातळी गाठली होती. जर तिने पैसे दिले नाहीत, तर तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती.

अवश्य वाचा:  अहिल्यानगर जिल्ह्यात २५०० बालमृत्यू ; जबाबदार कोण?

पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल  (Pune Crime News)

एवढेच नाही तर आरोपीने पीडित तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध ओढून तिची छेड काढली, तिचे फोटो हे गावातील एका ग्रुपवर व्हायरल करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हा छळ असह्य झाल्यामुळे अखेर पीडित तरुणीने पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन यासंदर्भात फिर्याद दिली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित हा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला याला बेड्या ठोकल्या. हा सर्व प्रकार २५ डिसेंबर २०२५ पासून ते तक्रार दाखल करेपर्यंतच्या कालावधीत घडला असल्याचे तपासात समोर आले आहे.