Pune Crime: पुण्यातील (Pune News) सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात (Dhankawadi Area) मंगळवारी मध्यरात्री दहशतीची घटना (Incident Of Terror) घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड(Vandalism of vehicles) केली. ही घटना काल (ता.२२) रात्री ११.४५ ते १ च्या दरम्यान घडली आहे.
नक्की वाचा : ‘आता त्यांनी बंदूक टाकून मुख्य धारेत यायला हवं’;देवेंद्र फडणवीसांचे माओवाद्यांना आवाहन
हल्लेखोरांनी १५ ऑटो रिक्षासोबत अनेक गाड्या फोडल्या (Pune Crime)
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,अज्ञात हल्लेखोरांनी एकूण १५ ऑटो रिक्षा, ३ कार, २ शालेय बस, आणि १ पॅगो टेम्पो यांच्या काचा फोडत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील त्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. या दोघांना तत्काळ उपचारासाठी कामे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : अभिनेत्री अमृता खानविलकरचा सातासमुद्रापार नृत्याविष्कार!
परिसरात भीतीचे वातावरण (Pune Crime)
या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून,आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढणवण्याची मागणी केली आहे.