Pune Crime: पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून निषेध 

0
Pune Crime:पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून निषेध 
Pune Crime:पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून निषेध 

नगर : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune) पुन्हा एकदा महापुरुषांचा अवमान (Insult to great men) केल्याची घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्टेशनसमोरील असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला (Statue of Mahatma Gandhi) काल (ता.७) रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र घालून पुतळ्यावर कोयत्याने (With a sickle on the statue) वार केल्याची घटना घडली. या विटंबनेच्या (Satire) घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : आता ‘या’ राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार;सरकारची घोषणा

सुरज शुक्ला पोलिसांच्या ताब्यात (Pune Crime)

या प्रकरणी सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला आहे.

अवश्य वाचा :  “आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’अनाजीपंतांनी दूर केला”- उद्धव ठाकरे

अरविंद शिंदे काय म्हणाले ? (Pune Crime)

यावेळी अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे की, मागील १२ वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी केली होती. हे कशाचे उदाहरण आहे. यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. मात्र हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही, तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या घटनेचा आम्ही आज निषेध नोंदवित असून पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे. मात्र या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत, अशी आमची मागणी आहे.