Pune Jain Boarding Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या भुखंड विक्री विरोधात अहिल्यानगरमध्ये निषेध मोर्चा

Pune Jain Boarding Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या भुखंड विक्री विरोधात अहिल्यानगरमध्ये निषेध मोर्चा

0
Pune Jain Boarding Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या भुखंड विक्री विरोधात अहिल्यानगरमध्ये निषेध मोर्चा
Pune Jain Boarding Land Case : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या भुखंड विक्री विरोधात अहिल्यानगरमध्ये निषेध मोर्चा

Pune Jain Boarding Land Case : नगर : पुण्यातील मॉडेल कॉलनीतील तीन एकर जैन वसतिगृह जागेचा वाद (Pune Jain Boarding Land Case) तापला आहे. पुण्यातील बिल्डर लॉबीविरोधात जैन समाज (Jain Society) एकवटला आहे. जैन समाजाने आज (ता. २७) सकाळी अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच जैन समाजाला न्याय न मिळाल्यास अहिल्यानगरमधील जैन स्थानकात ३० ऑक्टोबरपासून आंदोलन करण्यात येइल असा इशारा (Warning) देण्यात आला आहे.

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित

अहिल्यानगर येथे सकल जैन समाजाच्या वतीने कापड बाजार येथील जैन मंदिर, कापड बाजार, दाळ मंडई, आडते बाजार, धरती चौक यानंतर जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जैन समाजाचे नरेंद्र फिरोदिया, वसंत लोढा, नरेंद्र लोहाडे, ॲड. नरेश गुगळे, किशोर मुनोत, अनिल पोखरणा, संतोष गांधी, शैलेश मुनोत, अजय गंगवाल, सीए अशोक पितळे, सुमतीलाल कोठारी, संजय चोपडा, सीए अजय मुथा, संजय महाजन, सचिन कटारिया, महावीर गोसावी, कुणाल बडजाते, राजेंद्र बलदोडा, अजित कर्नावट, मनोज गुंदेचा, किरण काळे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, विक्रम राठोड, कुणाल भंडारी, महावीर बडजाते, शिरीष बेगडे, अमित मुथा, किशोर मुनोत, अजय बोरा, रणधीर लोखंडे, प्रशांत प्रांगळ, अशोक भंडारी, अनिल कोठारी, संतोष भोसे, संपतलाल मुथीयान, प्रशांत मुथा, दिलीप कटारिया, आरती लोहाडे, सारिका बडजाते, सौरखी धोंगडे, सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

तीन एकर जागेची बेकायदेशीर पद्धतीने विक्री (Pune Jain Boarding Land Case)

पुणे येथील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुविधा १९६० साला पासून सुरू करण्यात आली. मात्र, संस्थेची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्याचे कारण विश्वस्त मंडळाने दर्शवीत राज्याचे धर्मादाय आयुक्त याच्याकडे संस्थेची संपूर्ण तीन एकर जागा विक्री करण्यासाठी परवानगी मागितली. धर्मदाय आयुक्त यानी विश्वस्त मंडळाला जागा विक्री करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार विश्वस्त मंडळांनी गोखले बिल्डर या विकसकाला संस्थेची संपूर्ण तीन एकर जमीन ३१९ कोटी रुपयांना विक्री करण्यासाठी करार केला. त्यानुसार विकसक है संस्थेला २३० कोटी रुपये देतील व उर्वरित ८१ कोटी रुपयांच्या बदल्यात विकसक है ट्रस्ट सस्थेला दहा गुंठे क्षेत्र त्यावर साडेतीन गुंठे क्षेत्रात ४० हजार स्क्वेअर फुट बांधकाम ९९९ वर्षाच्या भाडे कराराद्वारे देतील. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडी पूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करत विश्वस्त संस्थेची पुणे येथील तीन एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून टाकली. इतिहासात प्रतिष्ठित जैन मंदिर हे विक्री झाले व गहाण टाकत त्याचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. या सर्व प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरती तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.