Pune-Nashik Semi High Speed ​​Rail : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन

Pune-Nashik Semi High Speed ​​Rail : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन

0
Pune-Nashik Semi High Speed ​​Rail : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन
Pune-Nashik Semi High Speed ​​Rail : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन

Pune-Nashik Semi High Speed ​​Rail : अकोले : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik Semi High Speed ​​Rail) पहिल्या प्रस्तावानुसार नाशिक-सिन्नर-अकोले सरहद्द मार्गे-संगमनेर-आळेफाटा-पुणे मार्गेच गेली पाहिजे. या मागणीसाठी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांनी नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन (Vidhan Bhavan) परिसरात लक्षवेधी आंदोलन केले.

अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना

रेल्वेमार्ग बदलला तर वेळ वाढणार

पुणे-नाशिक रेल्वे प्रवास कमीत कमी वेळेत व्हावा, यासाठी सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी आहे. जर हा रेल्वेमार्ग बदलला गेला तर नक्कीच वेळ वाढणार आहे. अकोले तालुक्यातील हजारो विद्यार्थी, कामगार वर्ग रोजगारासाठी पुण्याला जात असतो. येथील शेतमालाची देवाणघेवाण रेल्वेमुळे सहज शक्य होणार आहे.

नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

पर्यटनाचा होणार विकास (Pune-Nashik Semi High Speed ​​Rail)

त्याचसोबत अकोले तालुक्याला पर्यटन सौंदर्य लाभलेले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक याठिकाणी येतात. जर अकोले सरहद्दीतून रेल्वे गेली तर पर्यटनाचा विकास होणार आहे. येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यादृष्टीने या रेल्वेमार्गाविषयी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.