Pune News : पुण्यात तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आठवडाभरापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला.या प्रकरणी राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (ता.७) सादर झाला.त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणानंतर खासगी रुग्णालयासंदर्भात पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) अलर्ट मोडवर (Alert Mode)आली आहे. कोणतही डिपॉझिट घेऊ नका,अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार
‘रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका’ (Pune News)
रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका,अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा,अशा संदर्भातले आदेश प्रत्येक खासगी रुग्णालयाला देण्यात आले आहे. पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारा संदर्भात नोटीस पाठविली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे,असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीस मध्ये नमूद केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : प्रवीण तरडे यांची नवी इनिंग;’बोल मराठी’ गाणे झाले प्रदर्शित
रुग्णालयात मेडिकल निगलिजन्स आढळल्यास गुन्हा दाखल होणार (Pune News)
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात मेडिकल निगलिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. या प्रकरणी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहीत पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर महिलेला ५.३० तास रुग्णालयात बसवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी ससूनला लेखी पत्र लिहित पोलिसांनी माहिती मागवली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांनी पत्रासोबत जोडली असल्याची माहिती समोर येत आहे.