नगर : पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात रविवारी (ता.१९) पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने (Porsche Car Accident) मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल (Vedant Agrwal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिसांसह बार मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे.
नक्की वाचा : यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!
बार मालक आणि मॅनेजरलाही अटक (Pune Porsche Accident)
या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने सोमवारी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून ते फरार होते. पोलिसांकडून त्यांच्या शोध सुरू होता. यादरम्यान आज(ता. २१) पहाटे त्यांना छत्रपती संभाजीनगर भागातून अटक करण्यात आली. याशिवाय बार मालक आणि मॅनेजरलाही अटक करण्यात आली. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असतानाही त्यांनी त्याला मद्य दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे
विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल ? (Pune Porsche Accident)
आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन होता. त्याने पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३,५ आणि १९९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम ७७ आणि ७७ अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते.
वेदांत अग्रवाल हा ज्या हॉटेलमध्ये दारु प्यायला होता, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.