Pune Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला आहे.

0
Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident

नगर : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (ता.१९) पहाटे पोर्श कारने बाईक वरुन (Porsche Car Accident) जाणाऱ्या दोघांना धडक दिली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आता या अपघाताबाबत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.

नक्की वाचा : यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!

सोनाली तनपुरे यांच्या पोस्टमध्ये नेमके काय? (Pune Porsche Car Accident)

सोनाली यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पुणे अपघात प्रकरणातील मुलगा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून आम्हाला आमच्या मुलाची शाळा बदलावी लागली”.  तेव्हाच्या काही घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता”, असेही त्या म्हणाल्या. तसेच “पुण्यात झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा”,अशी मागणीही त्यांनी केली.

अवश्य वाचा : ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे  

पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक (Pune Porsche Car Accident)

पुण्यातील या अपघातप्रकरणी मंगळवारी (ता.२१) पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. तसेच बार मालक आणि मॅनेजरला पुण्यातून अटक केली. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी आरोपीवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here