Pune Rape Case:पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी 

0
Pune Rape Case:पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी 
Pune Rape Case:पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी 

Pune Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Stand) एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Rape Case) झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यापासून फरार असलेला आरोपी दत्तात्रय गाडेच्या (Dattatray Gade) मुसक्या आवळण्यात (Arrested) अखेर पोलिसांना यश आले आहे. फरार असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि ड्रोनचाही वापर केला. शेवटी त्याच्या गावात एका कॅनॉलच्या खड्ड्यात दत्तात्रय गाडे लपलेला पोलिसांना सापडला.

नक्की वाचा : ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे

अशी झाली तपासाला सुरवात… (Pune Rape Case) 


बुधवारी(ता.२६) पहाटे घडलेल्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळी उभ्या असलेल्या बसमधील पुरावे नष्ट होऊ नयेत, म्हणून ती बस तिथून हलवण्यात आली. या बसमधील साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली.बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आलं. यात आरोपी दत्तात्रय गाडे तरुणीला बसमध्ये नेत असल्याचं, तसेच घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी १३ पथकं तैनात केली. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं.

अवश्य वाचा : “सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”;प्रताप सरनाईक यांची माहिती
आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. मात्र,तो घरी नसल्याचं दिसून आलं.त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू करण्यात आला.आरोपीने गेल्या काही दिवसांन फोन केलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली जात होती. पोलिसांना आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूरमधील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांची १० पथकं दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली. गुरुवारी (ता.२७) दिवसभर पोलीस दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते.

पोलिसांनी डॉग स्क्वॉड, ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने केली गाडेला अटक  (Pune Rape Case)


रात्रीच्या वेळी दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी येऊन गेल्याची माहिती संबंधित गावकऱ्यानी पोलिसांना फोन करून दिली. यावेळी गाडेनं आपल्याला शरण जायचं असल्याचंही सांगितलं. तिथून गाडे गावातल्याच एका उसाच्या शेतात जाऊन लपल्याचं पोलिसांना समजलं. त्यावेळी जलिसांनी डॉग स्क्वॉड आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने दत्तात्रय गाडेला शोधण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीनंतरही पोलिसांचा ड्रोन संबंधित उसाच्या शेतावर फिरून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत होता.

डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला.अखेर कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर आलेला दत्तात्रय गाडे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तातडीने त्याच्या मुसक्या आवळल्या आणि मध्यरात्रीच लष्कर पोलीस स्थानकात त्याला ताब्यात घेण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here