Pune University:पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!

0
Pune University:पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!
Pune University:पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील फ्राईड राईसमध्ये रबराचे तुकडे!

नगर : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील (Pune) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृहात ढेकणं आढळून आली होती, त्याचबरोबर जेवणात अळ्या देखील आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर (Rubber in a food canteen meal) निघाल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठात जेवणाच्या बाबतीत वारंवार हलगर्जीपणा समोर आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.

नक्की वाचा : ‘फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानावं’-संजय राऊत    

फ्राईड राईस मध्ये रबर आढळल्याचा दावा (Pune University)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील ‘रूट ९३’ या चायनीज गाळ्यामध्ये हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केला आहे. या विद्यार्थ्यांनी बुधवारी(ता. १४) सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले होते. त्यावेळी फ्राईड राईस आणि नूडल्स खात असताना फ्राईड राईस मध्ये रबर आढळून आल्याचं समोर आलं आहे.पुणे विद्यापीठात फ्राईड राईस मध्ये रबर आढळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याच्या चर्चा होऊ लागल्या.

अवश्य वाचा : कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाह यांचं उच्च न्यालयाच्या निर्णयाला आव्हान    

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का ?(Pune University)

या प्रकरणी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठाकडून समिती स्थापन करत चौकशी करण्यात येणार आहे.मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रकारास जबाबदार कोण? असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत.