Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

0
Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Punha Shivajiraje Bhosale : नगर : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी बनविलेला ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ (Mi Shivajiraje Bhosale Boltoy) हा सिनेमा प्रचंड गाजला होता. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सिनेरसिकांना खास भेट म्हणून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Punha Shivajiraje Bhosale) हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया  

महेश मांजरेकर म्हणाले की,

समाजमाध्यमांवर टीझर प्रसिद्ध करताना महेश मांजरेकर म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’या सिनेमा प्रदर्शित होणार. दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला! जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे! “पुन्हा शिवाजीराजे भोसले” याजसाठी केला होता अट्टहास …

Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

अवश्य वाचा :  ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे

या सिनेमात चिमुकलीची खास भूमिका (Punha Shivajiraje Bhosale)

विशेष म्हणजे एका चिमुकलीची या सिनेमात खास भूमिका असल्याचं पाहायला मिळतंय. टीझरमध्ये ही चिमुकली ‘राजे ओ राजे..’ अशी हाक देताना दिसत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांची घोड्यावरुन एन्ट्री प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणते. त्यानंतर शिवाजी महाराज महादेवासमोर प्रार्थना करतानाही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. एकूणच सिनेमामध्ये शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मांडलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सिनेमा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडित आहे, अशी चर्चा आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. तर चिमुकलीची भूमिका साकारणार आहे बालकलाकार त्रिशा ठोसर. बालकलाकार त्रिशा टीझरमध्ये देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधताना पाहायला मिळत आहे.

यापूर्वी महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज सध्याच्या जगात कशापद्धतीने संकटांना सामोरं जायचं? याबाबत मार्गदर्शन पाहायला मिळाले होते. आता ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.