Punishment : दत्तक मुलीशी गैरवर्तन; सावत्र बापाला सक्त मजुरीची शिक्षा

Punishment : दत्तक मुलीशी गैरवर्तन; सावत्र बापाला सक्त मजुरीची शिक्षा

0
Punishment : दत्तक मुलीशी गैरवर्तन; सावत्र बापाला सक्त मजुरीची शिक्षा
Punishment : दत्तक मुलीशी गैरवर्तन; सावत्र बापाला सक्त मजुरीची शिक्षा

Punishment : नगर : पारनेर (Parner) तालुक्यातील दत्तक मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या सावत्र बापाला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा (Punishment) तसेच तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश (District Judge) माधुरी मोरे यांनी सुनवली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.

नक्की वाचा : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर

पीडितेला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी

२२ नोव्हेंबर २०२२ रोजी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या सावत्र वडिलांविरूध्द पारनेर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. आरोपी हा तिचा सावत्र वडील असून तो तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा. तसेच रात्रीच्या वेळी तिच्या सोबत अश्लील कृत्य करीत होता. याबाबत पीडितेच्या आईने आरोपीला समजावून सांगितले असता आरोपी तिला म्हणाला की, पीडित ही तुझी मुलगी नाही व माझीही मुलगी नाही. यावर पीडितेच्या आईने विरोध केला असता आरोपीने पीडितेला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली.

अवश्य वाचा : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले आठ साक्षीदार (Punishment)

याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडितेची आई, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी तसेच वया संदर्भात नगर महापालिकेचे माहीतगार व्यक्तींची साक्ष नोंदविण्यात आली.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म.पो.कॉ. अडसुळ, तसेच स. फौ. शिवनाथ बडे यांनी सहकार्य केले.