Punishment : अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षांची शिक्षा

Punishment : अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षांची शिक्षा

0
Punishment : अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षांची शिक्षा
Punishment : अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षांची शिक्षा

Punishment : नगर : अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार करणारा आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (रा. खडांबे खुर्द ता. राहुरी) यास २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा (Punishment) तसेच पाच हजार रुपये दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद शिक्षा ठोठावली आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश (District Judge) माधुरी एच. मोरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्यान्वे दोषी धरले आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.

नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड

पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी पोक्सो कायदा कलम वाढविला

अल्पवयीन मुलीस १७ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी गर्जे व गणेश राजेंद्र चव्हाण यांनी चेंडूफळ (ता. वैजापूर. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे पळवून नेले. याबाबत पीडितेच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. राहुरी पोलिसांनी पिडीत मुलीचा शोध घेवून, पीडित मुलगी तसेच आरोपी यांना २४ डिसेंबर २०२२ रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर राहुरी पोलिसांनी पिडीत मुलीचे जबाब नोंदविला. चेंडूफळ येथे एका पडीक खोलीमध्ये आरोपी विनायक गर्जे याने बळजबरीने अत्याचार केला. पिडीतेच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी विरुध्द पोक्सो कायदा कलम वाढविला. या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.

अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून

सरकारी वकिलांचा युक्तिवाद तसेच संपूर्ण पुरावा ग्राहय (Punishment)

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक यांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलीची साक्ष ग्राहय धरली. ही सुनावणी सुरू असताना पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १२ वर्षे २ महिन्याची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने ही घटना केली आहे. त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी वकिलांचा युक्तिवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील ॲड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो.कॉ. योगेश वाघ, तसेच इफ्‌तेकार सय्यद यांनी सहकार्य केले.