Punishment : नगर : शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील अल्पवयीन मुलीस बळजबरीने शरीर संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी शिरीष भाऊसाहेब कावले (वय. ३८, रा. कावले वस्ती, शहरटाकळी, ता. शेवगाव) यास विशेष जिल्हा न्यायालयाने (District Court) दोषी ठरवत त्याला दहा वर्ष सक्तमजुरी व दंडात्मक शिक्षा (Punishment) ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील (Advocate) म्हणून विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा पी. केळगंद्रे – शिंदे यांनी पीडितेची बाजू मांडली.
नक्की वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक : मुख्यमंत्री
५ जून २०२३ रोजी घडली होती घटना
पीडित मुलगी ही घरात एकटी असताना आरोपी शिरीष भाऊसाहेब कावले याने ५ जून २०२३ रोजी बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली होती. घटनेचा संपूर्ण तपास शेवगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी करून न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
अवश्य वाचा : भाजपकडून जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर; अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते
१८ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्वाची (Punishment)
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक, शेवगाव पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी भारत चौरे त्याचबरोबर पिडीतेच्या उपचारासंबंधात शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमावत, डॉ. दुवाडा तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पगारीया, डॉ. घुगरे, डॉ. उंदरे, डॉ. मंगेश राउत, डॉ. स्नेहल इंगळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच पिडीत मुलीच्या गर्भाच्या अंशाच्या चाचणीबाबत नाशिक वैद्यकीय प्रयोगशाळा येथील रासायनिक अधिकारी मारूती घुगे यांची साक्ष नोंदविण्यात आली. याबाबत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी व दंडात्मक शिक्षा ठोठावली.