Purush Teaser : जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

'रानबाजार' च्या जागतिक यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आता 'पुरुष' ही नवीन वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.

0
Purush Teaser
Purush Teaser

नगर : प्लॅनेट मराठी ओटीटी (Plannet Marathi OTT) नेहमीच धमाकेदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. ‘रानबाजार’ च्या (Ranbajar) जागतिक यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आता ‘पुरुष’ ही नवीन वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. नुकतेच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या वेबसिरीजची घोषणा करण्यात आली आहे. या टीझरला रसिकांनी लाईक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

नक्की वाचा : सनरायजर्स हैदराबादची फायनलमध्ये धडक;राजस्थानला हरवले  

पुरुषी अहंकार व त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार यावर भाष्य करणारी वेबसिरीज (Purush Teaser)

‘पुरुष’ ही वेबसिरीज जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित आहे. समाजरचनेतील पुरुषी अहंकार आणि त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार तसेच वास्तविक जीवनावर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत आणि अभिजित पानसे, श्रीरंग गोडबोले, प्रसन्न आजरेकर यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे. सचिन खेडेकर, मृण्मयी देशपांडे हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

अवश्य वाचा : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकांची घोषणा;२६ जूनला होणार मतदान

अभिजित पानसे घोषणेबाबत म्हणतात,”पुरुष ही वेबसिरीज पुरुष स्त्रियांबद्दल काय विचार करतात. स्त्रियांना माणूस म्हणून नाही तर लैंगिक वस्तू म्हणून पाहिलं जातं. याबद्दल स्त्रियांची प्रतिक्रिया या वेबसिरीजमध्ये पाहण्यासारखी आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रत्येक स्त्री पुरुषाने बघायला हवी.”

‘अभिजित पानसे आणि प्लॅनेट मराठीच घट्ट नातं’ (Purush Teaser)

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “अभिजित पानसे आणि प्लॅनेट मराठीच घट्ट नातं आहे. त्यांनी केलेली ‘रानबाजार’ वेबसिरीजला भरघोस यश मिळाल्यानंतर आता ‘पुरुष’ वेबसिरीज प्लॅनेट मराठी वर घेऊन येत आहोत. रानबाजार बघितल्यावर त्या वेबसिरीजचे कौतुक श्री. शाम बेनेगल, श्री. अमोल पालेकर, श्री. एन. चंद्रा यासारख्या दिग्गज व्यक्तींनी देखील केले आहे. अभिजित पानसे हे केवळ मराठीतीलच नव्हे तर देशातील एका उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते कायम वेगळे प्रयोग करत असतात. पुरूष ही वेबसिरीज अशा प्रकारे तुम्हाला पहायला मिळेल की असा प्रयोग जगात पहिल्यांदाच समोर येईल. त्यामुळे ह्या वेबसिरीजला भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here