Pushpa 2 Mera Sami Song:’पुष्पा २’ मधील ‘मेरा सामी’ गाणं रिलीज; श्रीवल्ली आणि पुष्पाच्या हुक स्टेपने वेधले लक्ष 

पुष्पा' २ मधील 'अंगारो': 'द कपल सॉन्ग' आउट झालं आहे. या गाण्यात श्री वल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे.

0
Pushpa 2 Mera Sami Song
Pushpa 2 Mera Sami Song

नगर : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही दिवसांपूर्वी ‘पुष्पा 2’ मधील पहिले गाणे रिलीज झाले होते. आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. ‘पुष्पा’ २ मधील ‘अंगारो’: ‘द कपल सॉन्ग’ (Angaroon The Couple Song) आउट झालं आहे. या गाण्यात श्री वल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे. या गाण्याचा सोशल मीडियावर कल्ला दिसून येत आहे.

नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी   

रश्मिकाच्या अदा आणि गायिका श्रेया घोषालच्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध (Pushpa 2 Mera Sami Song)

‘अंगारो’: ‘द कपल सॉन्ग’ हे गाणे युट्यूबवर येताच सोशल मीडियावर त्याने  खळबळ उडवून दिली आहे. ‘पुष्पा २’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांचं “पुष्पा: द राइज” मधील ‘सामी सामी’ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. आता या गाण्यात रश्मिका मंदान्नाच्या अनोख्या अदा आणि गायिका श्रेया घोषालच्या आवाजाने प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. गाण्यांपासून ते दमदार बीट्सपर्यंत या ट्रॅकबद्दलची प्रत्येक गोष्ट खास आहे. अपेक्षांच्या पलीकडे जाण्यासाठी डीएसपीचे कौशल्य यामध्ये सिद्ध होते.

अवश्य वाचा : सात-बारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

‘पुष्पा २ – द रुल’ चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार (Pushpa 2 Mera Sami Song)

‘पुष्पा २ – द रुल’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’ चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा२: द रूल’ हा ‘पुष्पा’: द राइज’ या चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here