Pushpa 2 Teaser Out :पायात घुंगरू तर डोळ्यात आग;अल्लू अर्जुनच्या  ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित  

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २'चा टिझर हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये 'पुष्पा'चा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.

0
Pushpa 2 Teaser Out
Pushpa 2 Teaser Out

नगर : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त आज ‘पुष्पा २’ चा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग पाहायला मिळत आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अल्लू अर्जुनच्या ४२ वा वाढदिवसा निमीत्त ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित (Pushpa 2 Teaser Out)  

ल्लू अर्जुन आज आपला ४२ वा वाढदिवस’पुष्पा:द राइज’ हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होते. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘पुष्पा २: द रूल’ची चाहत्यांना उत्सुकता आहे. अल्लू अर्जुन आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ‘पुष्पा २’चा टीझर रिलीज करण्याआधी एक पोस्टर शेअर करण्यात आलं होतं. यात अल्लू अर्जुन ‘पुष्पा’च्या अंदाजात दिसून आला होता. यामध्ये त्याच्या हातात कुऱ्हाड होती. तर ‘पुष्पा’ स्टाइलमध्ये तो सिंहासनावर बसला होता.

नक्की वाचा : ‘महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित  

‘पुष्पा २’ च्या टीझरमध्ये काय ? (Pushpa 2 Teaser Out)

xr:d:DAFvzVEvC2U:1526,j:4927805422597737,t:24040808

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’चा टिझर हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये ‘पुष्पा’चा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. हा टीझर पाहून ‘फ्लावर नहीं फायर है’ असं चाहते म्हणत आहे. हातात त्रिशूळ आणि शंख घेऊन तांडव करताना अल्लू अर्जुन पाहायला मिळत आहे.

‘पुष्पा २’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

अवश्य वाचा : राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ मधील फर्स्ट लूक प्रदर्शित; साकारणार उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here