Pushpa 2 : The Rule : बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचीच हवा, ‘पुष्पा 2’ ने फक्त चार दिवसांत कमवले 800 कोटी

Pushpa 2 : The Rule : बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचीच हवा, 'पुष्पा 2' ने फक्त चार दिवसांत कमवले 800 कोटी

0
Pushpa 2: The Rule : बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचीच हवा, 'पुष्पा 2' ने फक्त चार दिवसांत कमवले 800 कोटी

Pushpa 2 : The Rule : अहिल्यानगर : अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. अल्लू अर्जुन (Allu Arjun)रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2: द रूल’नं (Pushpa 2: The Rule) जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या चार दिवसांतच 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता लवकरच चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.

Pushpa 2: The Rule : बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचीच हवा, 'पुष्पा 2' ने फक्त चार दिवसांत कमवले 800 कोटी

नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान

लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार

‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी फक्त भर-भरूनच नाही तर उदंड प्रतिसाद दिला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं रिलीजच्या चार दिवसांत देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक वेगानं 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी आगाऊ बुकिंग झालं, यावरून या चित्रपटाची क्रेझ लक्षात येते. हा ॲक्शन थ्रिलर रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच देशातच नव्हे तर जगभरात खळबळ माजवत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून निर्मातेही अचंबित झाले आहेत. चित्रपटानं आपलं भांडवलं फक्त चार दिवसांतच जमा केलं आहे. यासह चित्रपटाची चार दिवसांत एकूण कमाई 529.45 कोटी रुपये झाली आहे. जगभरात या चित्रपटानं रिलीजच्या चार दिवसांत 800 कोटींचा टप्पा पार करून इतिहास रचला आहे. आता लवकरच चित्रपट एक हजार कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.

Pushpa 2: The Rule : बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचीच हवा, 'पुष्पा 2' ने फक्त चार दिवसांत कमवले 800 कोटी

अवश्य वाचा : राज्यात थंडीचा पारा वाढणार; पंजाबराव डख यांचा अंदाज

अनेक चित्रपटांना टाकले मागे (Pushpa 2 : The Rule)

या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तरीपण ‘पुष्पा २’ ने हा अभूतपूर्व टप्पा गाठला आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटानं गदर 2 च्या जगभरातील लाईफटाईम कलेक्शन 686 कोटी रुपये, बाहुबलीचे 650 कोटी रुपये, सालारचे 617.75 कोटी रुपये आणि पीकेचे 792 कोटी रुपयांच्या कमाईला फक्त चार दिवसांत मागे टाकले आहे.