Pushpa 2 Pre-Booking:’पुष्पा २’ ची प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई,’प्री बुकिंगमधून’ कमवले १० लाख डॉलर

0
Pushpa 2 Pre-Booking:'पुष्पा २' ची प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई,'प्री बुकिंगमधून' कमवले १० लाख डॉलर
Pushpa 2 Pre-Booking:'पुष्पा २' ची प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई,'प्री बुकिंगमधून' कमवले १० लाख डॉलर

नगर : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ (Pushapa2:The Rule) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तुफान कमाई केली आहे. अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची क्रेझ फक्त भारतातच नाही, विदेशातही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अमेरिकेत दहा लाख डॉलर कमावले आहेत. अमेरिकेतील प्रीमियर शोच्या तिकीट विक्रीतून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच १० लाख डॉलरहून अधिक कमाई केली आहे.

नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत गणित,विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी ‘इतके’ गुण आवश्यक  

 ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार (Pushpa 2 Pre-Booking)

अमेरिकेत ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा प्रीमियर ४ डिसेंबरला होणार असून ऍडव्हान्स तिकीट बुकिंगसाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. आतापर्यंत अमेरिकेतील ८५० लोकेशनवर या चित्रपटाची ४० हजार तिकिटे विकली गेली असून यातून निर्मात्यांनी दहा लाख डॉलरहून अधिक कमाई केली आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट येत्या ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. नेटफ्लिक्सने पुष्पा २’ चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल २७५ कोटींना खरेदी केले आहेत.

अवश्य वाचा : ‘नवीन सरकार आल्यास मनोज जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही’- चंद्रकांत पाटील

‘पुष्पा २’ रचणार विक्रम (Pushpa 2 Pre-Booking)

‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ चॅप्टर २’ पेक्षा पुष्पा २ चित्रपट जास्त धमाका करेल,अशी अपेक्षा आहेत. पुष्पा २ चित्रपटाने प्री-रिलीज कलेक्शनमध्येच कोट्यवधींची कमाई केली आहे. माहितीनुसार, चित्रपटाचे जगभरातील थिएटर मूल्य अंदाजे १००० कोटी रुपये आहे. असं झाल्यास ऑस्कर विजेते चित्रपट ‘आर आर आर ‘ आणि  ‘केजीएफ चॅप्टर २’ पेक्षा पुष्पा २ चित्रपटाचं यश मोठं असेल. पुष्पा २ चित्रपट केवळ तेलुगु चित्रपटसृष्टीतच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम रचण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here