नगर : सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा: द रुल’ची (Pushpa The Rule) जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच आय या चित्रपटातील पहिले गाणं रिलीज करण्यात आले. ‘पु्ष्पा २’ मधील या गाण्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. रॉकस्टार डीसीपीने लिहिलेले पुष्पा पुष्पा हे गाणं सहा भाषेत रिलीज करण्यात आले आहे.
नक्की वाचा : पंजाब किंग्जचा दणदणीत विजय;चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव
अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपची चाहत्यांना भुरळ (Pushpa Pushpa Song)
‘पुष्पा-पुष्पा’ या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तर अल्लू अर्जुनच्या स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या दमदार हुक स्टेपने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. गाण्यामध्ये पुष्पाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. अल्लू अर्जुन ने गाण्यामध्ये हेयर हायलाइट्स, प्रिंटेड शर्ट्स, फॉर्मल पँट, ज्वेलरी आणि हटके शूज असा लूक केलेला दिसत आहे. त्याच्या प्रिंटेड शर्टावर रक्ताने माखलेला हातही पाहायला मिळत आहे.
अवश्य वाचा : स्वरगंधर्व सुधीर फडके’ मध्ये ‘हे’ कलाकार साकारणार ‘या’ मुख्य व्यक्तिरेखा
५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार चित्रपट (Pushpa Pushpa Song)
‘पुष्पा २’ मधील ‘पुष्पा-पुष्पा’ हे गाणं सहा भाषांमध्ये रिलीज झाले आहे. तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. देवी श्री प्रसाद यांनी गाण्याच्या वेगवेगळ्या व्हर्जनसाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास यांसारख्या लोकप्रिय गायकांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.पुष्पाच्या हूक स्टेप्सची नेटकऱ्यांना भुरळ पडली असून नेटकरी या गाण्यावर रिल्स बनवत आहेत.
‘पुष्पा २: द रुल’ मधील ‘पुष्पा पुष्पा’ ह्या पहिल्या गाण्याला मिका सिंग आणि नकाश अजीझ यांनी आवाज दिला आहे. तर देवी श्री प्रसाद यांनी हे गाणं लिहिलं आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना सह फहाद फाझील, जगदीश भंडारी, प्रकाश राजही दिसणार आहे.