नगर : पावसाच्या (rain) लहरीपणाचा फटका यंदा रब्बी (Rabbi) क्षेत्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी चार लाख २९ हजार हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी झाली हाेती. यंदा ३० हजार हेक्टर (Hector) ने रब्बीचा पेरा कमी हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.
यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाला फटका बसला आहे. पिकांच्या उत्पादनात कमालीची घट हाेण्याची शक्यता आहे. पावसाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरण्या केल्या. त्यानंतर पिकांना दमदार पाऊस मिळालाच नाही. काढणीच्या वेळेत पाऊस आला. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे कर्जत, श्रीगाेंदे आदी बहुतांश भागात ज्वारीच्या पेरण्या झाल्याच नाही. त्यामुळे ज्वारीसाठी नगरकरांना आर्थिक चटके सहन करावे लागणार आहे. यंदा रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घट हाेऊन गहू, हरभरा आदी पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.