Radhakrishna Vikhe Patil : लाेकसभा निवडणुकीत महायुतीचा ४५ प्लसचा निर्धार; उद्या महायुतीचा महामेळावा

Radhakrishna Vikhe Patil

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : आगामी लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महायुतीकडून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या मेळाव्याचे नगर शहरातील बंधन लाॅन्स येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे,  अशी माहिती खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.

हे देखील वाचा : मुंबईच्या आंदाेलनात ३ कोटींपेक्षा कमी मराठे आले, तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्धार (Radhakrishna Vikhe Patil)

Radhakrishna Vikhe Patil

 
आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत. महायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पालकमंत्री विखे पाटील यांच्या नगर आणि श्रीरामपूर येथे घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महामेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रविवारच्या मेळाव्यात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगून महायुतीमध्ये चांगला समन्वय असल्याचे खासदार विखे पाटील आणि संग्राम जगताप यांनी सांगितले.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले; पण…

समन्वय समितीची नियुक्ती (Radhakrishna Vikhe Patil)


आमदार जगताप म्हणाले, ”राज्यातून लोकसभा निवडणुकीत ४५ जागा विजयी करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले उतर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा : मंदिर चोरी व घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here