Radhakrishna Vikhe Patil : सिस्पे प्रकरणी सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली, तर काहींचे खुलासे सुरू झाले; पालकमंत्री विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : सिस्पे प्रकरणी सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली, तर काहींचे खुलासे सुरू झाले; पालकमंत्री विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : सिस्पे प्रकरणी सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली, तर काहींचे खुलासे सुरू झाले; पालकमंत्री विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : सिस्पे प्रकरणी सीबीआय चौकशीची नुसती घोषणा झाली, तर काहींचे खुलासे सुरू झाले; पालकमंत्री विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : सिस्पे घोटाळा (Sispe Infinity Scam) प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशीची नुसती घोषणा झाली तर काहींचे खुलासे सुरू झाले. तुमचे कोणी नावच घेतले नाही, मग एवढे गडबडता काॽअसा सवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला.

पारनेर तालुका खरेदी विक्री संघाने सुरू केलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राचा प्रारंभ मंत्री डाॅ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेवून मंत्री विखे पाटील यांनी व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांना सामान्य कार्यकर्त्याना आधार देण्यासाठी तुम्ही एकत्र राहा, असा सल्ला देवून तालुक्याच्या अस्मितेसाठी तुम्हाला यापुढे काम करावे लागणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

अवश्य वाचा : ‘साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेकजण गोंधळले

तालुक्यात सध्या काय सुरू हे मी सांगण्याची गरज नाही. लोकच मला आता माहीती सांगत आहेत. याचा अर्थ सामान्य माणूस मोकळा झाला आहे. कोणतीही दहशत राहीलेली नाही. सिस्पे घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेने अनेकजण गोंधळले आपोआप खुलासे बाहेर येवू लागले. पण मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. कोणाचे नावच घेतले नाही, तर काहीजण एवढे गडबडले का ॽअसा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा: सिस्पे घोटाळ्याची चौकशीची घोषणा झाली तर एवढे गडबडता का? विखेंचा लंकेंवर निशाणा

मंत्री विखे म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

कोणत्याही परिस्थितीत तालुका आपल्याला दुष्काळमुक्त करायचा आहे. जे स्वप्न लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहीले होते ते पूर्ण करायचे आहे. साकळाई योजनेच्या कामाला सर्व मंजूरी मिळाल्या आहेत. कुकडी प्रकल्पात अधिकचे पाणी निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. डिंबे ते माणिकडोह बोगद्याच्या कामाबरोबरच तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे काम विभागाने सुरू केल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.


आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कोणीही असतील तुम्हाला एकत्रित काम करून शतप्रतिशत महायुती विजयी करण्यासाठी काम करावे लागेल. राज्य सरकार तुमच्या सोबत असताना कोणाच्या दबावाला घाबरता. तालुक्याची राजकीय परीस्थीती खूप बदलली आहे. सुपा औद्यगिक वसाहती मध्ये लक्ष घातल्यामुळेच स्थानिक युवकांना नौकरीच्या संधी मिळू लागल्या याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी योजनांची अंमलबजावणी यश्सवीपणे सुरू असून राज्यात ५६३ केंद्र सुरू आहेत. १ हजार १११कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. जिल्हयात ४७ केंद्राच्या माध्यमातून खरेदी सुरू असल्याची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

यावेळी विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, अशोक सावंत, सुजित झावरे, दिलीप दाते, गणेश शेळके, बाबासाहेब तांबे, विजय औटी, दिनेश बाबर, दत्ता कोरडे यांच्यासह सर्व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.