Radhakrishna Vikhe Patil : राहुरीच्या ३२ गावांमधील विकासाची गंगा केवळ विखे पाटील यांच्यामुळे सुरू : डॉ आशिष बिडगर

Radhakrishna Vikhe Patil : राहुरीच्या ३२ गावांमधील विकासाची गंगा केवळ विखे पाटील यांच्यामुळे सुरू : डॉ आशिष बिडगर

0

Radhakrishna Vikhe Patil : राहुरी : राहुरीच्या ३२ गावांमधील विकासाची गंगा केवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या दूरदर्शीपणा मुळे सुरू आहे. या भागातील रस्त्याचे , पाण्याचे आणि मूलभूत प्रश्न केवळ विखेंनी मार्गी लावले असल्याचे स्पष्ट मत भाजपचे (BJP) मंडल अध्यक्ष डॉ आशिष बिडगर (Dr. Ashish Bidgar) यांनी व्यक्त केले. वांजुळपोई ता. राहुरी येथील जिल्हा नियोजन निधी मधून मंजूर झालेल्या ५० लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या ९०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

अवश्य वाचा : लोणी-प्रवरानगर येथे २८ फेब्रुवारी पासून ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ चे आयोजन

श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थानचा रस्त्याचा प्रश्न मार्गी

तिळापुर येथील भिकाफाटा ते वांजुळपोई या ९०० मीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाचा येथील भिकाफाटा येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की या रस्त्यामुळे श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थानचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. या रस्त्यासाठी डॉ सुजय विखे यांनी विशेष प्रयत्न केल्याने हा रस्ता तात्काळ मंजूर झाला. त्याच बरोबर या भागात असणाऱ्या अडचणीच्या रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून या भागातील सर्वांगीण विकास होण्यासाठी पालकमंत्र्यांनी शब्द दिल्याचे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : ‘लाल वादळ’ संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Radhakrishna Vikhe Patil)

यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष हिरालाल जाधव , आण्णासाहेब कोळेकर, शामराव पवार, दाजीबा जाधव, , काशिनाथ जाधव, आण्णासाहेब सरोदे, अजित आढाव, रावसाहेब गरधे, आण्णासाहेब जाधव, सर्जेराव वाघमोडे, रंगनाथ काकड, एकनाथ पवार, अशोक बिडगर, बाळासाहेब सानप सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे संचालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.