Radhakrishna Vikhe Patil | नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याला मुख्य केंद्र बनविण्याच्या उद्देशाने आवश्यक ती कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या.
हे वाचा – अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

औद्योगिक विकासाला चालना (Radhakrishna Vikhe Patil)
जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या संदर्भात मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसंदर्भातील सर्व अडचणी दूर करून प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
अवश्य वाचा – इंग्लंडला नमवत भारताचा फायनलमध्ये प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा (Radhakrishna Vikhe Patil)
शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीबरोबरच राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सूचित केले. राहुरी तालुक्यात कृषी विद्यापीठाची जागा औद्योगिक विकासासाठी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या औद्योगिक वसाहतींमुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे पहा – VSR कंपनी मालक व्ही. के सिंगला सीआयडीकडून शाही पाहुणचार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा जिल्ह्याला मोठा लाभ होत आहे. या औद्योगिक विस्तारामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.



