Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर : कोविड (Covid) संकटाच्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकदाही मंत्रालयात (Ministry) फिरकले नाहीत. तर सरकारमधील मंत्री पर्यटनाला कुठे निघून गेले होते हे त्यांनाच माहीत आहे, अशी टीका राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.
हे देखील वाचा: २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको; मराठा आंदोलनाची पुढची दिशा
ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना साधन साहित्याचे वितरण (Radhakrishna Vikhe Patil)
संगमनेर तालुक्यातील १ हजार ८०० ज्येष्ठ नागरिकांना आणि ५६३ दिव्यांगांना केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या साधन साहित्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल खताळ, भाजपचे वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे, भाजप किसान मोर्चा राज्य सरचिटणीस रवींद्र थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख सोमनाथ कानकाटे, भाजप सरचिटणीस राहुल भोईर, अल्पसंख्यांचे रौफ शेख यांच्यासह भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संगमनेर तालुक्यातील २९ शाळांना मंजूर झालेल्या डिजिटल बोर्डाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.
नक्की वाचा : ‘मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात, रोज पलटी मारतात’- अजय महाराज बारस्कर
वयोश्री योजनेतून साधन साहित्याचे वाटप (Radhakrishna Vikhe Patil)
विखे पाटील म्हणाले, तालुक्यातील सुमारे १५ हजार ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून साधन साहित्याचे वाटप झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४५ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याने नगर जिल्हा हा देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मागील दहा वर्षात देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या योजनेचा लाभ मिळत आहे. देशाचा विकास साध्य करताना सामान्य माणूस विकास प्रक्रियेमध्ये जोडण्याचे मोठे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. या संकटात सुरु केलेली मोफत धान्याची योजना आजही सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणाचा निर्णय हा सुध्दा ऐतिहासिक ठरला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.