Radhakrishna Vikhe Patil : महायुती सरकारमुळेच खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला: राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : महायुती सरकारमुळेच खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला: राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna vikhe patil

Radhakrishna Vikhe Patil : श्रीरामपूर : खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीकरीता झालेल्या संघर्षास मिळालेले यश खूप महत्वपूर्ण आहे. अनेक कायदेशीर (legal) लढाया करून जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या. खंडकरी शेतकऱ्यांना महायुती सरकारमुळेच (Mahayuti sarkar) न्याय मिळाला. आता आकारी पडीत जमीनीबाबतचा निर्णयही लवकर करू, आशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

हे देखील वाचा : ‘मै हू डाॅन’ गाण्यावर सुजय विखे, कर्डिलेंचा तुफान डान्स; चाहत्यांचा एकच जल्लाेष

४५२ शेतकऱ्यांना ४ हजार हेक्टर जमीन (Radhakrishna Vikhe Patil)


तालुक्यातील उक्कलगाव येथे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा निर्णय केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचा सत्कार आणि पेढेतुला करण्यात आली. तालुक्यातील ४५२ शेतकऱ्यांना ४ हजार हेक्टर जमीन महायुती सरकारमुळे मिळाली असून यामध्ये ९९ शेतकरी उक्कलगावचे असल्याची माहीती त्यांनी दिली.

नक्की वाचा: मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजनेला वेग; ४० हजार काेटींची गुंतवणूक, २५ हजार राेजगार

युती सरकारने मात्र सर्व कायदेशीर बाबी पूर्ण (Radhakrishna Vikhe Patil)


विखे पाटील म्हणाले, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीच्या प्रश्नाचे मोठे राजकारण झाले. पण काॅ. माधवराव गायकवाड आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्णायक संघर्ष केला. या संघर्षाचे यश आज आपल्या सर्वाना पाहायला मिळत आहे. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यापुर्वी फक्त आश्वासन दिली गेली. ज्यांचा काही संबंध नव्हता ते या प्रश्नावर केवळ बोलत होते. युती सरकारने मात्र सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे विखे पाटील म्हणाले.


याप्रसंगी इंद्रभान थोरात, माजी सभापती पी आर शिंदे, भाजपचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे, सरचिटणीस नितीन दिनकर, गणेश मुदगले, नानासाहेब शिंदे, नानासाहेब पवार, शंकरराव मुठे, सोसायटीचे चेअरमन पुरूषोतम थोरात आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here