Radhakrishna Vikhe : नगर तालुका : ज्यांनी आठ महिन्यांपूर्वी अजितदादा बरोबर जाण्याची भूमिका घेतली. दादांकडून निधी घेतला आणि त्यांना देखील सोडून दिलं, असे लोक जनतेला देखील सोडून देतील, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नीलेश लंके यांचा नामोउल्लेख टाळत केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन केले जाऊ लागले आहे. दक्षिणेमध्ये नीलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) असा सामना होणार आहे. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नीलेश लंकेवरती जोरदार निशाणा साधला.
हे देखील वाचा : बॉम्बच्या अफवेने ‘लालपरी’ कर्जतमध्येच रोखली
आघाडीच्या उमेदवारावर हल्लाबोल (Radhakrishna Vikhe Patil)
अहमदनगर लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
नक्की वाचा : फुटबाॅल खेळ रुजवण्यासाठी गाॅडविन डिक यांचे माेलाचे याेगदान ः नरेंद्र फिराेदिया
विखे पाटील म्हणाले (Radhakrishna Vikhe Patil)
अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणती विकासकामे केली. तुमचं सरकार असताना या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे होते. आज माझा पवारांना सवाल आहे की, त्यांचे उमेदवार आज गावोगावी एमआयडीसी आणण्याचा भाषण करतायेत. मात्र, तुम्ही तरी गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यात एखादा प्रकल्प आणू शकलात का, अशा शब्दात मंत्री विखे यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.