Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर : राज्यातील स्वतःला काँग्रेसचे (Congress) मोठे नेते समजतात, पण दुर्दैवाने जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसच्या वाट्याला आणता आली नाही. पदवीधर मतदारसंघाच्या (Graduate Constituency) निवडणुकीच्या वेळी तुमचे बेडगी प्रेम जनतेने पाहिले. दुसऱ्याला पक्ष निष्ठा शिकवताना तुमच्या कोणत्या निष्ठा आहेत? काँग्रेस पार साफ झाली आहे. तुम्ही काँग्रेस पक्ष कुठे नेऊन गहाण टाकला? आणि हे आम्हाला पक्षनिष्ठ शिकवतात, अशी जहरी टीका करत “गरीब श्रीमंतांची लढाई” असे वक्तव्य तुम्ही करता तर इथे तयारीला लागा, संगमनेरमध्ये गरीब श्रीमंतांची लढाई लावू. आपण काय बोलतो, काय वक्तव्य करतो हे तरी जरा पहात जा, असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आमदार थोरातांना नाव न घेता दिला आहे.
नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश
संगमनेरमध्ये मेळाव्याचे आयोजन (Radhakrishna Vikhe Patil)
संगमनेरमध्ये मालपाणी लॉन्स येथे संकल्प महाविजयाचा या मेळाव्यात भाजपचे स्टार प्रचारक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री अरविंद सावंत, शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, भाजपाचे तालुका प्रमुख वैभव लांडगे, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गनफुले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपिल पवार, जावेद जहागिरदार, राहुल भोईर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा: मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
विखे म्हणाले (Radhakrishna Vikhe Patil)
संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोकात नाही, यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान आदरणीय पवार साहेबांनी केले आहे. विकासाचे रोल मॉडेल म्हणवून घेताना १०० टँकर तालुक्यात चालू आहे. हे विकासाचे रोल मॉडेल का.? जनतेला ४० वर्षे पाणी मिळाले नाही. भोजपुरचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. विकासाचे मॉडेल टँकरमुक्त असायला पाहिजे. कोणती योजना काँग्रेसने दिलीये, असा सवाल करत फक्त घराघरात भांडण लावायचे तालुक्यात एवढेच केले, अशी टीका विखे यांनी केली.