Radhakrishna Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पारनेरमध्ये भेटीचा धडाका; समाजसेवक अण्णा हजारेंची घेतली भेट

Radhakrishna Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पारनेरमध्ये भेटीचा धडाका; समाजसेवक अण्णा हजारेंची घेतली भेट

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर :  गुढीपाडव्याचा (Gudhipadva) मुहूर्त साधून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी तालुक्यात भेटीगाठीचा धडाका लावला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

पारनेर दौरा लक्षवेधी

दोन दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांना आलेली धमकी आणि या घटनेचे जिल्ह्यात उमटलेले पडसाद पाहाता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेला पारनेर दौरा लक्षवेधी ठरला आहे. या दौऱ्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण येथे भेट घेऊन मंत्री विखे पाटील यांनी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघामध्ये सुमारे अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, या चर्चाचा तपशील समजू शकला नाही.

दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद (Radhakrishna Vikhe Patil)

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्याचा संवाद समाजमाध्यमामध्ये प्रसारीत झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. प्रसारीत झालेला संवाद आणि त्यातील व्यक्तीविरोधी उमेदवारांचे समर्थक असल्याची चर्चाही सुरू झाली. याविरोधात महायुतीच्या वतीने पुरावे सादर करून संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. या घटनेनंतर मंत्री विखे पाटील यांचा पारनेरचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून प्रचाराचा कानमंत्र सुद्धा दिला आहे. आगामी काळात तालुक्यातील प्रचाराचे नियोजन तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. विशेष म्हणजे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांची निवासस्थानी जाऊन मंत्री विखे पाटील यांनी भेट घेतली. एक तासाच्या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here