Radhakrishna Vikhe Patil : प्रत्येक याेजनेला माेदीजींची गॅरंटी : मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : प्रत्येक याेजनेला माेदीजींची गॅरंटी : मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले आहे. संकल्‍प पत्रातून जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्‍या संकल्‍प पत्राचा आत्‍मा असल्‍याचा विश्‍वास महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला.

हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

संकल्‍प पत्राची माध्‍यमांना दिली माहीती (Radhakrishna Vikhe Patil)

लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहीती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांना दिली. भाजपाच्‍या संकल्‍प पत्रासाठी देशातील लोकांच्‍या काय अपेक्षा आहेत, यासाठी सूचना पाठविण्‍याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्‍यांच्‍या आवाहानाला प्रतिसाद देऊन, संपूर्ण देशातून १६ लाख सूचना यासाठी प्राप्‍त झाल्‍या. नगर जिल्‍ह्यातूनही १० हजार सूचना संकल्‍प पत्रासाठी पाठविण्‍यात आल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil

नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार

विखे पाटील म्‍हणाले (Radhakrishna Vikhe Patil)

नागरिकांच्‍या सूचनांमधून तयार झालेल्‍या या संकल्‍प पत्रात भारताच्‍या आंतरराष्‍ट्रीय संबधापासून ते देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेपर्यंत. समृद्ध भारत, सुशासन, स्‍वस्‍थ भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्‍या विकासाबरोबरच इनोव्‍हेशन, टेक्‍नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्‍य देण्‍यात आल्‍याचे सांगून विखे पाटील म्‍हणाले, ”२०४७ सालापर्यंत विकसीत भारत निर्माण करण्‍याचे उद्दिष्ट पूर्ण करण्‍यासाठी युवाशक्‍ती, नारीशक्‍ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्‍त करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला आहे. रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करतानाच स्‍टार्टअप योजनेला प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  केला जाणार आहे.

Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil


 भारताला प्रक्रिया उद्योगाचे हब बनवून प्रक्रिया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल, असे उद्दिष्ट या संकल्‍प पत्रातून ठेवण्‍यात आले आहे. संस्‍कृती आणि परंपरेची जोपासना करतनाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्‍याचा मानस संकल्‍प पत्रातून व्‍यक्त करतानाच मागील दहा वर्ष देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्‍यातील पाच वर्षे हे महिलांच्‍या भागीदारीचे असतील. याकरिता नारीशक्‍ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्‍या सरकारची मोठी उपलब्‍धी ठरली असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले .  

   भाजपाच्‍या संकल्‍प पत्राच्‍या अनुषंगानेच लोकसभा मतदार संघांचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यात रोजगार निर्मिती, तीर्थक्षेत्र पर्यटन तसेच जिल्‍ह्यातील प्रलंबित पाणी योजनांच्‍या सोडवणुकीसाठी प्राधान्‍य देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखील वारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here