Radhakrishna Vikhe Patil : नगर : मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती आहे. चारा टंचाई निवारणार्थ पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाकडून (Department Of Animal Husbandry) दोन ते अडीच महिने चारा पुरेल, अशी उपाययाेजना केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई भेडसवणार नाही, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
हे देखील वाचा: ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे
मंत्री विखे पाटील म्हणाले
”टंचाई परिस्थिती निर्माण होणार ही शक्यता लक्षात घेऊनच विभागातील अधिकाऱ्यांना चारा नियोजनाच्या सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा चारा उत्पादन करण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली आहे.
नक्की वाचा: यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!
पुढचे दोन ते अडीच महिने चारा पुरेल असे नियोजन (Radhakrishna Vikhe Patil )
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या चाऱ्याचा दरही शासनाने निश्चित केला आहे. त्यामुळे संपूर्ण उत्पादित झालेला चारा खरेदी करण्याची हमी शासनाने घेतली आहे. चारा छावण्या सुरू करण्याबाबत मतमतांतरे आहेत. कारण यापूर्वी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करून, आज त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण पुढचे दोन ते अडीच महिने चारा पुरेल असे नियोजन विभागाने केले आहे.”