Radhakrishna Vikhe Patil : नगर : महायुती सरकारचा लोककल्याणकारी अर्थसंकल्प (Budget) शेतकरी, महिला आणि युवक यांच्या उत्कर्षाचा आहे. गायीच्या दुधाकरिता पाच रुपयांच्या अनुदानासह महिलांना प्रोत्साहन युवकांना संधी आणि वारकरी बांधवाना सामाजिक सुरक्षा देणाऱ्या अर्थसंकल्पातून सामाजिक उत्कर्ष साध्य करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. नेवासे येथील संत ज्ञानेश्वर (Saint Dnyaneshwar) महाराजांच्या मंदिराचा विकास आराखडा तयार करण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्वागत केले आहे.
पाच रुपये अनुदानाच्या निर्णयाचे विखेंकडून स्वागत
राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचा संदेश आजच्या या अर्थसंकल्पातून मिळाला आहे. पीकविमा योजनेबरोबरच नमो किसान सन्मान योजना, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना पाच हजार कोटी रुपयांची मदत, कांदा उत्पादकांना अनुदान देण्याच्या निर्णयाबरोबरच गायीच्या दुधासाठी १ जुलै २०२४ पासून पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या निर्णयाचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत केले आहे.
अवश्य वाचा: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अकोलेत निदर्शने
विविध योजनांची घोषणा (Radhakrishna Vikhe Patil)
दुग्ध व्यवसायाला पाठबळ देताना अहिल्यादेवी मेंढी शेळी पालन विकास महामंडळातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासही दिलेली चालना महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तसेच मुलीना मोफत शिक्षण व परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबरोबरच राज्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि बचत गटातील महीलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देण्याची तरतूद निश्चितच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता महत्त्वपूर्ण आहे.