Radhakrishna Vikhe Patil : दुधाला हमीभाव मिळण्यासाठी शाहांना साकडे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली भेट, सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

Radhakrishna Vikhe Patil : दुधाला हमीभाव मिळण्यासाठी शाहांना साकडे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली भेट, सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

0

Radhakrishna Vikhe Patil : नगर : ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांनाही हमीभाव द्या, अशी मागणी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे केली आहे. त्यावर केंद्र सरकार (Central Govt) निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री शाह यांनी दिली. 

नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

दूध व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून

मंत्री विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. दुधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil : दुधाला हमीभाव मिळण्यासाठी शाहांना साकडे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली भेट, सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही
Radhakrishna Vikhe Patil : दुधाला हमीभाव मिळण्यासाठी शाहांना साकडे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली भेट, सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही

अवश्य वाचा : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील कीर्तनकाराला जीवे मारण्याची धमकी

केंद्र सरकार सकारात्मक (Radhakrishna Vikhe Patil)

दरम्यान, राज्य सरकारने सद्य परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता, मंत्री विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन दुधाला ३० रुपये स्थायीभाव व ५ रुपये शासकीय अनुदान, असा ३५ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी तीन महिन्याकरिता अनुदान दिले. दुधाच्या हमी भावाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबात सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री शाह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here