Radhakrishna Vikhe Patil : नगर : आघाड्यांचा खेळ फार काळ टिकणार नाही. त्यामुळे देशात कितीही पक्ष एकत्रित आले, तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : अयोध्येतील प्रभू श्रीरामांसाठी थेट पाकिस्तानातून पाठवला पोशाख
पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्त्याच्या सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ ३३ /११ के. व्ही. विद्युत केंद्राचे लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विश्वनाथ कोरडे, काशिनाथ दाते, सीताराम खिलारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, आश्विनी थोरात, सरपंच बाळासाहेब रेपाळे, उपसरपंच सुहास पुजारी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या निधीतून ग्रामीण भागाच्या विकासाचे नवे चित्र समोर येत आहे. संपूर्ण देश आज बदलत आहे. अन्य देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांवर आली आहे. मोदींच्या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक माणसाला मिळत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नक्की वाचा : ‘अवकाळी’चा नगर जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांना फटका
काेराेनाच्या संकटात संपूर्ण जग थांबले होते. तेव्हा प्रधानमंत्र्यानी देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली. या योजनेला २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली. प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती आपल्याला वाढवावी लागणार आहे. गायरान जमिनीची उपलब्धता असेल आणि तशी मागणी आल्यास घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाच ‘क’ वर्गात समावेश करण्याचे जाहीर करतानाच अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या ४४ हजार शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ७ कोटी रूपये तातडीने देण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.