Radhakrishna Vikhe Patil | दुधाला ३० रुपये दर व पाच रुपयांच्या अनुदानावर राज्य सरकारचे शिक्कामोर्तब; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही : राधाकृष्ण विखे पाटील 

Radhakrishna Vikhe Patil | नगर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. १ जुलैपासून हे दर लागू होणार आहेत. दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुपये अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

बैठकीत सहमती (Radhakrishna Vikhe Patil)

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ, आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती. या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्या विचारात घेता राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलीटर ३० रुपये भाव देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर शासन शेतकऱ्याला ५ रुपये प्रतिलीटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. जेणे करून शेतकऱ्याला प्रतिलीटर ३५ रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती.

अवश्य वाचा : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील कीर्तनकाराला जीवे मारण्याची धमकी

उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध (Radhakrishna Vikhe Patil)

आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते या निर्णयाला संमती दर्शवली. लवकरच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला जाईल. शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here