Radhakrishna Vikhe Patil : नगर : भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिनाभरात दाखले (Certificates) वाटप करा, त्यासाठी विशेष शिबिरांचे सर्व जिल्ह्यात आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले. त्याचबरोबर कागदपत्रांची (Document) कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर त्यांना दाखले देण्यात यावे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका
विधान भवनातील कार्यालयात विषेश बैठकीचे आयोजन
भटके विमुक्त यांना विविध दाखले मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील कार्यालयात विषेश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, महाआयटी विभागाच्या मुख्य व्यवस्थापक जयश्री भोज, त्याचबरोबर भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी आदी उपस्थित हाेते.
नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी
दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या (Radhakrishna Vikhe Patil)
यावेळी महसूल मंत्री यांनी भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आणि दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. आधार कार्ड, शिधापत्रिका, आयुष्यमान कार्ड, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्यासाठी भटक्या विमुक्त विकास परिषेदेच्या संयोजकांवरोबर तालुकास्तरावर तहसीलदार, ग्रामसेवक यांनी काम करावे आणि प्राधान्याने महिनाभरात जास्तीत जास्त शिबिरे राबवून त्यांना दाखल्यांचे वाटप करावे, असे मंत्री विखे म्हणाले. सर्व विभागीय आयुक्तांनी दर आठवड्याला या संदर्भात बैठक घेऊन अडचणी सोडवाव्यात आणि ३० ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी, असे त्यांंनी सांगितले.