Radhakrishna Vikhe Patil : तुमच्या मुलांचा छंद पुरवलेला चालताे, आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा हे शिकवण्याची गरज नाही; मंत्री विखेंचे थाेरातांना प्रत्युत्तर

Radhakrishna Vikhe Patil : तुमच्या मुलांचा छंद पुरवलेला चालताे, आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा हे शिकवण्याची गरज नाही; मंत्री विखेंचे थाेरातांना प्रत्युत्तर

0
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : ”आमच्या मुलाचा किती छंद पुरावायचा, काय करायचं, हे मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही आपलं घरदार राजकारणात (Politics) उतरवलच आहे. तुमच्या घरातल्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो. दुसऱ्याच्या मुलाची का काळजी करता तुम्ही?,” असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) प्रत्युत्तर दिले आहे.

नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

महसूलमंत्री विखे पाटील यांचे थोरात यांना प्रत्युत्तर (Radhakrishna Vikhe Patil)

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, ”डॉ. सुजय विखे स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मनात काय विचार केला. त्यावर चर्चा नाही. पण जो निर्णय घेईल, तो योग्यच असला पाहिजे. तालुक्याचं काय झालंय? तालुक्याला नवीन चेहरा हवा, अशी आता लोकांची भावना झाली आहे. लोकभावनेचा काय आदर करायचा, हे सर्व पक्ष श्रेष्ठींना कळवू. ते निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

अवश्य वाचा : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Balasaheb Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here