Radhakrishna Vikhe Patil : खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देता आल्याचा आनंद : मंत्री विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देता आल्याचा आनंद : मंत्री विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देता आल्याचा आनंद : मंत्री विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देता आल्याचा आनंद : मंत्री विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : खंडकरी शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनीकरिता झालेल्या संघर्षास मिळालेले यश खूप महत्त्वपूर्ण आहे. अनेक कायदेशीर लढाया करून जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या. खंडकरी शेतकऱ्यांना महायुती (Mahayuti) सरकारमुळेच न्याय देता आल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. ते रुई येथील आयाेजित कार्यक्रमात बाेलत हाेते.

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

मंत्री विखे पाटील म्हणाले (Radhakrishna Vikhe Patil)

”महायुती सरकारमुळे राज्‍यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. राहाता तालुक्‍यातील सुमारे २ हजार ३०५ शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करुन त्‍याचे सात-बारा उतारे सुपूर्द करण्‍यात आले. १४ गावांमधील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी त्‍यांच्‍या नावावर झाल्‍या आहे. ५० टक्‍के नजराना कमी झाल्‍याने या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला आहे. तसेच सार्वजनिक हितासाठी शेती महामंडळाच्‍या जमिनीही देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला. माझ्या राजकीय आयुष्‍यातील सर्वात ऐतिहासिक दिवस आजचा आहे.

अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका

या जमिनींसाठी वर्षांनुवर्षे संघर्ष (Radhakrishna Vikhe Patil)

खंडकरी शेतकऱ्यांच्या जीवनातील नवा अध्‍याय आजपासून सुरू होणार आहे. या जमिनींसाठी वर्षांनुवर्षे संघर्ष झाला. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, स्‍व. माधवराव गाडकवाड, स्‍व. सुर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे यांचा नामोल्‍लेख करुन, या सर्वांच्‍या मेहनतीमुळे या संघर्षाला न्‍याय मिळू शकला. राज्‍यात महायुतीचे सरकार आल्‍यानंतर या प्रश्‍नाचा आपण व्‍यक्तिश: पाठपुरावा केला. शेतकऱ्यांची बाजू भक्‍कमपणे मांडली. त्‍यामुळेच मंत्रिमंडळात या जमिनी भोगवटा वर्ग दोनमधून एक करण्‍याचा निर्णय होऊ शकला. मात्र, शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार येऊ नये, ही भूमिका आपण कायम ठेवल्‍यामुळेच विनामोबदला या जमीनी शेतकऱ्यांच्या नावावर होऊ शकल्‍या. या जमिनी शेतकऱ्यांना मिळूच नये, हीच भूमिका जिल्‍ह्यातील काही नेत्‍यांची होती. यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे त्‍यांना कोणतेही देणेघेणे नव्‍हते,” अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.

यावेळी आमदार आशुतोष काळे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, शेती महामंडळाचे प्रदिपकुमार पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here