Radhakrishna Vikhe Patil : सैनिकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार; मंत्री विखे पाटलांची माजी सैनिकांना ग्वाही

Radhakrishna Vikhe Patil : सैनिकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार; मंत्री विखे पाटलांची माजी सैनिकांना ग्वाही

0
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : नगर : महसूल पंधरवड्यामध्ये ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमात सर्व सैनिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी जयहिंद माजी सैनिक (Maji Sainik) बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष निलकंठ उल्हारे यांनी केली. मागणीचे निवेदन महसूलमंत्री (Minister of Revenue) राधाकृष्ण विखे पाटलांना दिले. त्यावर महसूल पंधरवड्यामध्ये सैनिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

नक्की वाचा: भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र  

प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची मागणी

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सर्व सैनिक, अर्धसैनिकांच्या सर्व समस्या साेडवण्यासाठी ५ ते १५ ऑगस्ट या महसूल पंधरवड्याअंतर्गत कामे मार्गे लावण्यात येईल, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबराेबर बैठक आयाेजित करून प्रश्न साेडवले जाईल, असे मंत्री विखे पाटलांनी सांगितले. आर्मी, नेव्ही व एअरफोर्सच्या माजी सैनिकांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे होते. याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्धसैनिकांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय स्थापन करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

अवश्य वाचा: निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा : आमदार थोरात

यांची उपस्थिती (Radhakrishna Vikhe Patil)

यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, नगरसेवक संपत बारस्कर, निखिल वारे, दत्ता सप्रे, राजेंद्र कातोरे, महेश कांडेकर, संजय भोर, धनराज सप्रे, बाळासाहेब मोरे, दीपक जाधव, दीपक बरे, नितीन खंडारे, आकाश कोल्हाळ, संकेत गुंजाळ, शुभम हजारे, रामभाऊ घाडगे, आप्पासाहेब सप्रे, रवींद्र इंगळे, रघुनाथ दांगट, अनिल सत्रे, लहू सुलाखे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here