Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा लोकांनी ओळखला : विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा लोकांनी ओळखला : विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर : आम्ही काम करणारे माणसं आहोत, केवळ हसून वेळ मारून नेणारे नाही. एकीकडे महायुतीच्या योजनांना विरोध करण्यासाठी न्यायालयात जायचे आणि दुसरीकडे योजनांचे फॉर्म भरून घेण्यासाठी धावपळ करायची, हा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्याचा दुटप्पीपणा लोकांनी ओळखला असल्याने राज्यातील सामान्य माणूस महायुतीच्या (MahaYuti) पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास महसूल (Revenue) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

योजनांचे प्रमाणपत्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत वितरीत

महसूल पंधरवडा निमित्ताने तालुक्यातील १ हजार ८०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे प्रमाणपत्र मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले. प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, मुख्याधिकारी राहूल वाघ, भाजपाचे शहराचे अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरद गोर्डे, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, भाजपच्या महीला जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागिरदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

मंत्री विखे पाटील म्हणाले (Radhakrishna Vikhe Patil)

राज्यातील सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे लोकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील ६ लाख महीलांनी अर्ज दाखल केले केले असून, एकट्या संगमनेर तालुक्यात ८० हजार ४१४ भगीनींनी दाखल केलेले अर्ज मंजूर झाले असून, येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे विखे पाटील यांनी सांगितले. महायुतीच्या योजनेच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते न्यायालयात गेले. पण न्यायालयाने सुध्दा त्यांना चपराक देवून सरकारच्या योजनेला आणि राज्यातील भगीनींना न्याय दिला असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला. सरकारने मागील अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिल्याने एकट्या संगमनेर तालुक्यात ४७३ कोटी रुपयांचा निधी योजना आणि विकास प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिला असल्याचे स्पष्ट करून तालुक्याच्या विकासकामांना निधी कमी पडणार नाही. हा तालुका विकासासाठी आता आपण दत्‍तक घेणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी केले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांचे भाषण झाले. कार्यक्रमास तालुक्यातील लाभार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here