Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे कालव्याचे पाणी शेवटच्‍या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी नियोजन करा – राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे कालव्याचे पाणी शेवटच्‍या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी नियोजन करा - राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे कालव्याचे पाणी शेवटच्‍या शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी नियोजन करा - राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : राहाता : निळवंडे धरणातून (Nilwande Dam) आज उच्‍चस्‍तरीय कालव्‍यांसह डाव्‍या आणि उजव्‍या कालव्‍यांचे पूजन करुन पाणी सोडण्‍यात आले. ओव्‍हर फ्लोच्‍या पाण्‍याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रथमच लाभ होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्‍या शेतकऱ्याला पाणी मिळेल, असे नियोजन करण्‍याच्‍या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलसंपदा विभागाच्‍या (Jalsampada Vibhag) अधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत.

नक्की वाचा: मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन

राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत जलपुजन

निळवंडे धरण स्‍थळावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत आज जलपुजन करण्‍यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर यांच्‍यासह जलसंपदा विभागाचे वरिष्‍ठ आधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. मागील आठवड्यात धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये पावसाने चांगली हजेरी लावण्‍याने निळवंडे धरणातून ओव्‍हर फ्लोचे पाणी सोडण्‍याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. ओव्‍हर फ्लोचे पाणी कालव्‍याना सोडावे, अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या होत्‍या.

अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

सर्व उपाययोजना करण्‍याचे निर्देश (Radhakrishna Vikhe Patil)

शुक्रवारी (ता. ९) संगमनेर येथील कार्यक्रमामध्‍ये शनिवारीच पाणी सोडण्‍याची ग्‍वाही महसूलमंत्री विखे पाटील यांनी दिली होती. त्‍याप्रमाणे धरणाच्‍या डाव्‍या आणि उजव्‍या कालव्‍यातून पाणी सोडण्‍यात आले. उच्‍चस्‍तरीय कालव्‍यातूनही पाणी सोडण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍या. विखे पाटील म्‍हणाले की, शेतकऱ्यांना पाणी मिळेल यासाठी सर्व उपाय योजना सुरू करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले आहेत. बंधिस्‍त नलिका वितरण प्रणालीच्‍या कामासाठी जलसंपदा‍ विभागाने काढली आहे. संपुर्ण लाभक्षेत्रासाठी बंधिस्‍त नलिका वितरण प्रणालीतून पाणी देण्‍याचा निर्णय झाला असल्‍याचे विभागातर्फे सांगण्‍यात आले. यामुळे शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी पुरवठा होवू शकेल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here